Saturday 27-01-2018 3:48:04 PM

निळी थीम हिरवी थीम केशरी थीम | मानक प्रखरता तीव्र प्रखरता

अक्षर आकार

Current Size: 100%

भाषा

शब्दशोध

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभाग

महाराष्ट्र शासन

भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

केंद्रिय समाजकल्याण बोर्ड

ज्यावेळी समाजातील वंचित घटकांकरिता कल्याणकारी सेवा पध्दतशीरपणे उपलब्ध नव्हत्या आणि कल्याणकारी सेवांकरिता पायाभूत सुविधा देखील स्थापित नव्हत्या त्यावेळी केंद्रीय समाज कल्याण मंडळ अस्तित्वात आले. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचे पंडीत जवाहरलाल नेहरू, पंडीत गोविंद्वल्लभ पंत आणि श्री. सी.डी. देशमुख या सारखे द्रष्टे नेते नुकत्याच झालेल्या फाळणी आणि धार्मिक बेबनाव यांच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांचा समग्रपणे विकास घडवून आणण्याकरिता कृती आराखडा (ब्र्ल्यू प्रिंट) तयार करीत होते.

डॉ. दुर्गाबाई देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, संसदकुशल खासदार आणि नियोजन आयोगाच्या सदस्या, यांना शासनाचे स्त्रोत तसेच स्वैच्छीक सामाजिक नेत्याची उर्जा आणि व्याप्ती यांच्यात समन्वय साधाण्यासाठी नुकत्याच स्थापन केलेल्या मंडळाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षामध्ये बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मंडळ सामाजिक बदलाचे साधन म्हणून स्थिरपणे विकसित व प्रगल्भ होत आहे. त्यांच्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये क्षेत्रीय स्थिरता कायम ठेवण्यासाठी तसेच समाजाच्या गरजांकरिता संवेदनशील राहण्याकरिता, नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा उत्तमरितीने पूर्ण करण्याकरिता मंडळ त्यांच्या उपक्रमांमध्ये सुधारणा आणि नव्याने आखणी किंवा बांधीण करीत आहे.

आगामी दशकांकरिताच्या दृष्टीकोनानुसार केंद्रीय समाज कल्याण मंडळाची उद्दिष्टे पुढिलप्रमाणे आहेत:

  • मानवीय दृष्टीकोन घेऊन स्वयंसेवी चेतना निर्माण करून परिवर्तक म्हणून काम करणे.
  • महिलांचे आणि मुलांचे सक्षमीकरण करण्याकरिता एकनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभारण्यास मदत करणारी यंत्रणा निर्माण करणे.
  • समता, न्याय आणि सामाजिक बदलाकरिता लिंग भेद रहित दृष्टीने काम करणारा संवेदनशील व्यावसायिकांचा वर्ग विकसित करणे.
  • महिला आणि बालकांसाठी नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढाकार घेऊन लिंगविशिष्ट धोरणांची शिफारस करणे.
  • स्वयंसेवी संस्थां सक्षम करणे आणि त्यांचा विस्तार वाढवून ज्या क्षेत्रात ’निर्मीत’ योजना पोहचल्या नाहीत तेथे पोहचविणे.
  • स्वैच्छीक क्षेत्रांना शासनाकडून उपलब्ध निधी मिळाविता यावा याकरिता निरिक्षकाची भूमिका घेऊन स्वैच्छीक क्षेत्राचे सामजिक लेखापाल आणि मार्गदर्शक म्हणून काम करणे.
  • स्थित्यंतरातून जाणाऱ्या समाजामध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिला आणि बालकांच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या नवीन आव्हानाबाबत जाणीव जागृती करणे.